फ्री मेथोडिस्ट चर्च राजुर,येथील तड़फ़दार व कर्तव्यदक्ष सदस्य सुनील कोमलवार यांचे निधन
🙏 निधन वार्ता 🙏
यवतमाळ येथे आजाराने निधन, राजुर येथील परिसरात शोककळा
वणी: राजूर येथील रहिवाशी असलेले व गावात सुप्रसिद्ध कुंग -फू कराटे मास्टर म्हणून ओळख असणारे सुनील कोमलवार यांचे निधन यवतमाळ येथे अल्पशा आजराने निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात आजारी झाल्याने त्यांनी यवतमाळ येथे स्वतः उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र काल त्यांची प्रकृती अचानक खालावली . मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली व ही दुःखद वार्ता राजुर येथे वाऱ्यासारखी पसरली.
राजूर येथील निवासी असलेले सुनील कोमलवार हे राजुर येथील फ्री मेथोडिस्ट चर्च ,येथील तड़फ़दार व कर्तव्यदक्ष सदस्य व तसेच गावात सुप्रसिद्ध कुंग -फू कराटे मास्टर म्हणून ओळख व ते प्रगतिनगर येथे ते डब्लू .सी. एल .नौकरीत कार्यरत होते . त्यांना कराटे ह्या कलेचा छंद होता. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून समाजकार्य करायचे.
सुनील कोमलवार आम्हाला सोडून हे जाणे धक्कादायकच – याकोब पेरकावर यांचा मते,
” गावातील सुप्रसिद्ध कराटेपटु व कुंग फू मास्टर ह्या नावानी ओळख होती . तसेच राजुर चर्च येथील सदस्य म्हणून सुनीलसोबत माझी 30 वर्षांपासूनची मैत्री व संबध होते. सुनील आज आपल्यात नाही यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये. अनेक ठिकाणी आम्ही सोबत समाज कार्य केले. त्याच्या प्रयोगातून त्याने त्याचं स्वत:चं एक कराटेचे विश्व निर्माण केले .ही कला प्रसार करण्यात एक मोलाचा सहभाग होता. आम्ही सर्वानी केवळ एक कराटे पटु नाहीतर एक चांगली तदफ़दार व्यक्ती देखील गमावली आहे.” फ्री मेथोडिस्ट राजुर चर्चचे सर्व सदस्य व राजुर महिला संघातर्फे व तसेच जेष्ट सदस्य याकूब पेरकावार यांचाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि .
सुनील कोमलवार यांचा निधनाने राजुर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व दोन मुली , भाऊ , बहिनी व आई असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिव शरीराचे अंत्यसंस्कार आज यवतमाळ येथे करण्यात येणार आहे.



