सोलर प्लेटच्या समश्यामुळे शेतकऱ्यांचा वाढला त्रास
CRI सोलर कंपनीचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:- विविध शेतकरी आपल्या शेतासाठी उत्पन्न योग्य वेळेवर व्हावा म्हणून शेतात विद्युत तार जात नसल्याने सोलर प्लेट ची मागणी करून आपल्या शेतात ठेकेदार पद्धतीने लावलेल्या सोलर चे बिघाड झाल्यानंतर पाहिजे तशी सेवा न मिडाल्याने शेतकऱ्याची फसगत झाल्याची दिसत आहे. विद्युत महावितरण कडून विविध कंपनी कडे सोलर प्लेट ची ठेका दिलेल्या कंपनी कडून योग्य पद्धतीची सेवा उपलब्ध होत नसल्याने काही शेतकरी विद्युत अभावी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतीला पाणी पुरवठा अभावी उत्पन्न योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा मोटा फटका बसला आहे. शेतात सोलर प्लेट असल्याने विद्युत विभागाने शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करू शकत नाही. शेतकरी सोलर प्लेट च्या बिघाड झालेल्या दुरुस्थीच्या प्रतीक्षेत आहेत. अश्याच शिवणी येथील शेतकरी देवराव गेडाम व अन्य शेतकऱ्याच्या शेतात गेल्या काही महिन्या पूर्वी CRI सोलर कंपनीने लावून दिलेल्या सोलर प्लेटमध्ये बिघाड झाल्यानंतर कुठल्या ही प्रकारची सेवा योग्य वेडेत पुरवत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विद्युत विभागाने सदर कंपनीशी संपर्क साधून बिघाड झालेल्या सोलर प्लेट ची दुरुस्थ करून देण्यात यावे किंवा शेतकऱ्यांना विद्युत तार पुरवण्यात यावे या करिता सदर शेतकऱ्याची मागणी होत आहे.



