Vidarbh24News

Latest Online Breaking News

येत्या २ तासात संजय सरोवर धरणाचे गेट उघडण्यात येणार जनतेला सतर्कतेचा इशारा

येत्या २ तासात संजय सरोवर धरणाचे गेट उघडण्यात येणार जनतेला सतर्कतेचा इशारा

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ गोंदिया:
गेल्या काही दिवसापूर्वी गोसेखुर्द आणि संजय गांधी सरोवर मधील पाणी सोडल्यामुळे पूर्व विदर्भात महा पूरपरस्थिती निर्माण झाली होती परत आज ०८सप्टेंबर २०२० ला धरणाची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे धरण सुस्थीतीत नियंत्रणाकरीता येत्या २ तासात संजय सरोवर धरणाचे गेट उघडण्यात येणार आहे. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून ये जा करणाऱ्याना सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवड्यात गोसेखुर्द आणि संजय गांधी सरोवर मधील पाणी सोडल्यामुळे पूर्व विदर्भात महापूराने हाहाकार माजवला होता. हजारो हेक्टर पिकाची नासाडी झाली होती. शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नाही. आजची जलाशय पातळी : ५१७.७५ मी . आजचा उपयुक्त पाणीसाठा : ३३३.६७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : ८१.३८ % / ३गेट १.०मी.विसर्ग : – ४२५.० क्युमेक्स १५००० क्युसेस प्रवाह सोडण्यात येणार आहे. अशी माहिती आर.आर.मेश्राम बा.ई.पा.वि .गोंदिया यांनी दिली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!