ब्रम्हपुरी येथील एका व्यक्तीचा गडचिरोलीत कोरोना मुळे मृत्यू
गडचिरोली येथील १४ जणांसह आज नवीन २८ बाधित, तर २९ कोरोनामुक्त
विदर्भ 24न्युज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली: जिल्हयात आज २९ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील ६,चामोर्शी येथील २१, सिरोंचा १, व आरमोरी १, असे एकूण २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २८ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील १४ यात एक गरोदर स्त्री, सावली तालुक्यातील २,स्थानिक ११ रूग्णांचा समावेश आहे. आरमोरी येथील दोघे यात १ आरोग्य कर्मचारी व १ कोरोना बाधिताच्या संपर्कातील बाधित आढळून आले आहेत. वडसा येथील ५ जण यामध्ये इतर बाधितांच्या संपर्कातील २, मागील १० दिवसात लक्षणे आढळल्यानंतर सर्वेक्षणात आढळून आलेले ३ जण. कोरची येथील ३ प्रवासी कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुलचेरा येथील आरोग्य कर्मचारी १ व १ प्रवासी बधित आढळून आले आहेत. आहेरी येथेही १ प्रवासी बाधित आढळून आला. तर चामोर्शी येथे १ रूग्णाच्या संपर्कातील बाधित आढळला असे आज एकुण २८ नवीन कोरोना बाधित आढळले.
ब्रह्मपुरी येथील ४७ वर्षीय इसमाचा गडचिरोलीत कोरोनामुळे मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा ६ सप्टेंबरला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. हा व्यक्ती ६ सप्टेंबरला पहाटे तीन वा. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाला. त्याला ताप, झटके व श्वसनाचा त्रास होत होता. लक्षणे पाहून त्याची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान रुग्णावर उपचार सुरू होते. त्याच दिवशी सकाळी ०८:०० वाजता त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.



