सावली शहरात एकाच दिवशी 9 कोरोना बाधित..
- सावली शहरात एकाच दिवशी 9 कोरोना बाधित..
ब्रेकिंग न्यूज…
विदर्भ 24ने2स प्रत्तीनिधी
सावली शहरात कोरोना ने हातपाय पसरायला सुरू केले असून गेल्या मंगळवार पर्यंत एक ही रुग्ण नसलेल्या सावली शहरात आज तब्बल 9 नवीन रुग्ण निघाल्याने चांगलीच धास्ती वाढली आहे.तसेच निमगाव मध्ये ही 2 जण बाधीत आलेले आहे.सावली शहरात नगरपंचायत,पोलीस विभाग,प्रशासन विभाग मध्ये कोरोनाने प्रवेश केला असून येथील ही काही जण बाधीत झाल्याची माहिती पुढे आलेली असून कोरोना हा वाढीवर असल्याचे दिसत आहे.प्रशासन कोरोना बाबत सक्त असतांना ही त्यांना स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांची साथ मिळत नसल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे,मास्क वापरावे व सामाजिक अंतर राखून आपला व्यवहार करावा, आवश्यक असेल तर घराबाहेर पडावे अश्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



