राजुर येथे ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना ब्यूटी पार्लर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप
राजुर येथे ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना ब्यूटी पार्लर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप
आशा रामटेके,
ग्रामीण प्रतिनिधि,राजूूर.
वणी – तालुक्यातील राजुर गावात मुलींना व महिलांना ब्यूटी पार्लर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .जिल्हा परिषद यवतमाळ महिला व बालकल्याण विभाग व जनहित बहुउद्देशिय संस्था वडगाव ,यवतमाळ. यांचे अंतर्गत महिलांना व मुलींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दि.१० जानेवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत देण्यात आले.या एक महिन्याच्या कालावधि प्रशिक्षण यशस्विरित्या पुर्ण केले.
या ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना ब्यूटी पार्लरचे तांत्रीक प्रशिक्षण देण्यात आले व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्याना ग्राम पंचायत राजुर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र वाटप जि. प.सदस्य संघदिप भगत व राजुरच्या माजी सरपंचा प्रणिता यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प. चे सदस्य संघदिप भगत, राजुरच्या माजी सरपंचा प्रणिता व पदाधिकारी उपस्थित होते.



