रक्तदान करून साजरी केली युगातल्या शरद जोशी यांची जयंती

शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांची ८६ वी जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन साजरा केली. दिनांक ३ सप्टेंबरला झालेल्या या रक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.सलग २० वर्षापासून शरद जोशी सरांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले जात आहे.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ऍड.वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेला घामाच्या दामाचा मंत्र देऊन त्यांना वाचविण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्याचा लढा उभा करतानाचा स्वाभिमान जागा केला.
राजुरा ग्रामीण रुग्णालयापुढील राम मंदिर सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात माजी आमदार ऍड. वामनराव चटप, ऍड. मुरलीधर देवाळकर,निळकंठराव कोरांगे,अरुण नवले, बाजार समिती सभापती कवडू पोटे,शेषराव बोंडे,प्रभाकर ढवस,अनिल ठाकुरवार,रमाकांत मालेकर,पंढरी बोन्डे, सुभाष रामगिरवार,ऍड.राजेंद्र जेनेकर, ऍड.श्रीनिवास मुसळे,मधुकर चिंचोलकर,कपिल इद्दे,भास्कर मत्ते, सुरेश आस्वले,राजकुमार डाखरे, शुभम रासेकर,स्वप्नील पहानपटे,बळीराम खुजे,डॉ. गंगाधर बोढे,दीपक चटप,गजेंद्र झंवर,निखिल बोण्डे,सुरज गव्हाणे,अजझर हुसेन,सूरज जीवतोडे,केतन जुनघरे,उत्पल गोरे यांचेसह अनेक जण यात सहभागी झाले.