चंद्रपूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांनी केली आर्थिक मदत .
चंद्रपूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त लोकांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रति कुटुंब 10 हजार रुपये नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशातल्या संजय सरोवर प्रकल्पाचं पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत.
त्यामुळे ब्रह्मपुरी आणि सावली तालुक्यातल्या हजारो हेक्टर धान शेती सह अनेक गावं पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची तात्काळ दखल घेत वडेट्टीवार यांनी स्वत: पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत ही मदत जाहीर केली आहे. तसंच विस्थापित झालेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.



