Vidarbh24News

Latest Online Breaking News

राज्यात E-Pass रद्द ! अनलॉक 4 ची नियमावली जाहीर, जाणून घ्या !  काय चालू अन् काय बंद!

वणी – राज्य सरकारनं अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. या गाईडलाईन्सकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अनलॉक 4 मध्ये काय सुरू असेल आणि काय बंद असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती. केंद्राच्या सूचनेनंतर आता राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. 1 जून पासून अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 1 सप्टेंबरपासून आता अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या 3 टप्प्यांच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात नियम आणखी शिथील झाले आहेत.

मुंबईतील विमानांची उड्डाणं आणि लँडींगची संख्या 1 सप्टेंबरासून दुप्पट करण्यात येणार आहे. विमानांची उड्डाणं आणि लँडींगची संख्या आतापर्यंत 100 होती जी आता दुप्पट होणार आहे. जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई पासची गरज नाही. हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मेट्रो आणि सिनेमागृह मात्र बंदच राहणार आहेत.

शाळा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू करता येणार नाहीत. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये आधी लागू असलेले निमय कायम राहतील. स्थानिक परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यासंदर्भात निर्णय घेतील.

 

अनलॉक 4 मध्ये काय सुरू आणि काय बंद ?

– हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरू राहणार

– शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच

– 30 सप्टेंबर पर्यंत मेट्रोही बंद

– खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा

– सिनेमा हॉल 30 सप्टेंबरपर्यंत बंदर राहणार

– मंदिरं आणि जीम याबद्दल कोणतीही घोषणा नाही.

– स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स आणि बिअर बार यांवरील बंदी कायम

– सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यमक्रमांना लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येता येणार नाही.

– अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानं आधीच्या नियमांचं पालन करतील.

– मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे, पिंपरी चिंचवड या भागात ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहता येईल.

– जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई पासची गरज नाही

– प्रवास करताना चालकासह टॅक्सीत 4 तर रिक्षात 3 प्रवाशांना मुभा

– खासगी 4 चाकी वाहनात 4 लोकांना प्रवास करण्याची मुभा

– सावर्जनिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत

– अंत्यविधीसाठी देखील 20 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!