Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव महानगर प्रमुख पदी अनिल मोतीराम सोनवणे यांची निवड

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव महानगर प्रमुख पदी अनिल मोतीराम सोनवणे यांची निवड

विदर्भ 24न्यूज
जळगाव: मेहरून येथील रामेश्वर कॉलनी रहिवासी असलेले पोलीस बॉईज व सामाजिक कार्यकर्ते अनिल मोतीराम सोनवणे यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव महानगर प्रमुख पदी व कार्यकारिणी प्रमुखपदी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी निवड केली आहे.अनिल सोनवणे हे मागील 15 ते 20 वर्षांपासून सामाजिक कार्य करत आले आहेत, जळगाव मधील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसोबत त्यांचे आपुलकीचे नाते आहे, तसेच अनिल सोनवणे हे प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात व सहकार्य करतात ते सन 2015 पासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव मधील पोलीसांच्या मदतीला जातात व त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात, सन 2016 रोजी पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने अनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनसमुदाय एकत्र येऊन जळगाव येथे पोलीसांच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चा काढला होता, त्यामुळे अनिल सोनवणे यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव महानगर प्रमुख पदी निवड केल्याचे जाहीर करून व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.अनिल सोनवणे यांच्या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष – नितीन ब्राह्मणे, जळगांव जिल्हा उपाध्यक्ष – मंगलसिंग राजपूत,जळगाव जिल्हा मार्गदर्शक – डॉ.अतुल पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष – दिनेश परदेशी, चोपडा तालुका अध्यक्ष – मुन्ना ठाकूर, पाचोरा तालुका अध्यक्ष – नदीम शेख,चाळीसगाव तालुका अध्यक्ष – निखिल सोनवणे, यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!