वलनी फाट्याजवळ जवळ भिषण अपघात एक ठार तर एक गंभीर जखमी..
लोकनेते राजूभाऊ झोडे यांनी तत्परता दाखवून वाचविले एका युवकाचे प्राण..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ मुल: येथून कार्यकर्त्यांसोबतची बैठक पूर्ण करून परत चंद्रपूरकडे येत असताना राजूभाऊ झोडे यांना वलनी फाट्याजवळ दोन युवक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. दोन्ही युवक दुचाकीने प्रवास करतांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. जवळपास अर्धा तास होऊनही कोणीही त्या जखमी युवकांच्या जवळ जात नसल्याचे समजले असता राजूभाऊ झोडे, यांनी समोर पडलेले जखमी युवकाजवळ आपले वाहन थांबविले व दोघांनाही हात लावून बघितले असता एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर एक युवक बेशुद्ध अवस्थेत गंभीर जखमी असल्याने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्यांनी आपल्या वाहनात उचलून लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. स्वतःच्या हाताने त्या जखमी युवकाला स्ट्रेचरने ढकलत आणून आणि तेथील कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलवून त्या जखमी युवकावर उपचार करायला लावले.
जर दहा ते पंधरा मिनिट उशीर झाला असता तर युवक दगावला असता असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. जखमी युवकाला उपचार होईपर्यंत त्या ठिकाणी राजूभाऊ व त्यांचे सहकारी प्रशांत उराडे व गुरु कामटे स्वतः उपस्थित होते. जखमी युवक मंदा तुकुम, तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथील असल्याची खातरजमा करून आपल्या कार्यकर्त्यांकडून युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क करायला सांगितला व नातेवाइकांना माहिती मिळाली असे कळताच व एक दोन नातेवाईक रुग्णाच्या जवळ आल्यानंतर राजूभाऊ झोडे यांनी त्या जखमी युवकाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून बाहेर आले.आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी राजूभाऊ झोडे यांनी एका युवकाचे प्राण वाचविले. क्षणाचाही विलंब न करता त्याला दवाखान्यात नेले. जर वेळेवर उपचार झाला नसता तर तो युवक दगावण्याची शक्यता जास्त होती. अशा या संवेदनशील, लोकनेत्याला त्यांच्या वाढदिवसादिनी खूप खूप शुभेच्छा व सर्वत्र अभिनंदन केले जात आहे..




