कायर गावात “लंपि “ह्या रोगाच्या पशुच्या संख्येत वाढ .-लम्पी” आजारांवर पशुधन कायर विभागात लक्ष घालण्याची पशुपालकांची मागणी !

कायर येथे पशु डॉक्टर वारंवार अनुपस्थित असल्याने लंपिचे इलाज थातुर मातुर होत असल्याने गावात असंतोषाचे वातावरण निर्माण
वणी – तालुक्यातील कायर गावात कोरोना महामारीत पशूपालक बांधव एकीकडे कसा -बसा शेतीचा गाडा बैलासारख्या पाळीव जनावरांद्वारे हाकत असताना .या जनावरावर “लम्पी” नावाच्या आलेल्या साथरोगराईमूळे ऐन शेतीच्या हंगामात तालुक्यातील कायर गावात बहुतेक पशुपालकाना संकटाचा सामना करावा लागत आहे
सदर बैलावरील साथरोग मागील अनेक दिवसापासून सुरू असून बैलाच्या अंगावर सूज,गाठी आदी लक्षणे डास -गोचिडमूळे दिसून येत असल्याच्या तक्रारी काही पशुपालकानीं कायर गावातील सरपंचाकडे व पशु विभागाकडे व्यक्त केल्या आहेत.
तालुक्यातील कायर गावात संबंधीत रोगावरील वेक्सिनचे लसीकरण, फवारणी तसेंच औषधी ची व्यवस्था व्हावी व पशु डॉक्टर हा नियमीत उपस्थित राहावा ,अशी मागणी गावातील त्रस्त नागरिक करत आहे .लंपि हा रोग कायर गावत खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी दिसून येत आहे . ह्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे गावात पशु डॉक्टरची अनुपस्थिति होय .शेतकरी जेव्हा केव्हा पशु वैद्यकाकड़े जात आहे .तेथील डॉक्टर हे उपस्थित राहत नसल्याने चित्र दिसून येत आहे .पशु डॉक्टरचा अनुपस्थित तिथे थातुर मातुर उपचार करुन पाठवत असल्याचे दिसून येत आहे . तिथे ह्या पशुना वाचविन्याऐवजी मारण्याचा प्रयत्न होत आहे की क़ाय ? ऐसा प्रश्न नागरिकांना उपस्थित झाला आहे .त्याकारणास्त्व गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लंपिचा ह्या रोगाने पशुपालक एकच मागणी करत आहे की ,कायर येथे पशु वैद्य नेहमी उपस्थित राहावे .व लंपि रोगाचे उपचार प्रत्यक्ष पशु डॉक्टरनेच करावे !अन्यथा सर्व कायर येथील पशुपालक हे कधी उग्र स्वरूप धारण करेल हे सांगता येणार नाही