गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, बाधितांसह आज ६६ नवीन बाधित
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, बाधितांसह आज ६६ नवीन बाधित जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण बाधित संख्या १०५८झाली
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली: येथे आज १६ नवीन कोरोना बाधित यामध्ये १ आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून १, चामोर्शी येथून आलेला १, रामनगर येथील ४, सामान्य रूग्णालयतील ७ यामध्ये कनेरी येथील एक, शिवनी येथील १, चणकाईनगर येथील रुग्णालयात दाखल असलेला १ असे १६ जण, तर चामोर्शी शहरातील केवट मोहल्ला,कुंभार मोहल्ला व मार्केट लाईनमधील ४६९ जणांची आज तपासणी केली त्यात ४३ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. तर विसोरा वडसा येथील १ एसआरपीएफ,धानोरा येथील के.जी.बी.व्ही. शाळेतील १ स्वयंपाकी,सिरोंचा येथील विलगीकरणातील ४ व कुरखेडा येथील १असे मिळून आज ६६नवीन बाधित मिळाले.तसेच आज १२ जण कोरोनामूक्त झाले यात गडचिरोली येथील २ स्थानिक व ३ पोलीस, आहेरी ४ जण यात एकजण कर्करोगाने ग्रस्त होता त्याने कोरोनवार मात केली. भामरागड येथील २ पोलीस तर चामोर्शी मधील २ स्थानिकांनी कोरोनावर मात केली.यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी २०६ झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ८५१ तर आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण बाधित संख्या १०५८ झाली.



