वणी येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे वाहनावर कार्यवाही
वणी येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे वाहनावर कार्यवाही
वणी -वणी शहरात काल रोजी 27. 8 .2020 गुरूवारला गणेशोत्सव संबंधाने वणी परिसरात पोलिस ताफा पेट्रोलिंग करताना बोधे नगर ,चिखलगाव वणी परिसरात महिंद्रा पिकअप एम.एच् -49 -डी .7964 ह्या गाडी मध्ये अवैधरित्या देशी दारू भरून सापडली. माहितीनुसार पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता आरोपी राजू शंकर आत्राम वय 22 वर्ष आरोपी राजू रा.गोकुळ नगर वणी हा त्याठिकाणी सापडला .लगेच वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी दारूचे बॉक्स भरून असल्याचे दिसून आले. संपूर्ण दारूची पाहणी केली असता,त्यात रॉकेट देशी दारूचे 77 बॉक्स 180 मि.ली.क्षमतेची दारू अंदाजे किंमत ,एक लाख 92 हजार पाचशे रुपये तर ,88 बॉक्स 90 मि.ली क्षमतेची दारू किमान दोन लाख 28 हजार 819.रु एकूण दारू ₹ 4,21,301 पकडण्यात आली .

तसेच दारूची वाहतूक करणे करीता उपयोगात आणलेली महिंद्रा पिकप एम.एच् -49 -डी .7964 किमान किंमत पाच लाख रुपये असा एकूण .नऊ लाख 21 हजार तीनशे रुपये मुद्देमालासह जप्त करण्यात आला .सदर आरोपीने रोगांचे प्रादुर्भाव असताना हयगय 10 करून मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले व त्याचबरोबर त्याचे विरुद्ध अप.क्र. 810/2020 कलम 269, 188 भा. द.वी.सह कलम 65 (अ ),(ई) ,82,83 मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही सुशील कुमार नायक उपविभागीय. पोलिस अधिकारी, वणी.यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक. वैभव जाधव डी.बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक .गोपाल जाधव, सुनील खडागळे, सतपाल मोहाडे ,अमित पोयाम ,पंकज उंबरकर यांनी केले.




