रानडुकराच्या हल्यात चेक तळोधी येथील शेतकरी जखमी;
रानडुकराच्या हल्यात चेक तळोधी येथील शेतकरी जखमी;
रानडुकराच्या थैमानाने शेतकर्यांना शेती करण्यास अडचण;
नितीन रामटेके 
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
८६९८६४८६३४
गोंडपिपरी:- तालुक्यातील चेकतळोधी येथील शेतकऱ्यावर रानडूकराचा प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली. त्या शेतकऱ्याचे नाव सुधाकर कुकुडकार आहे. सुधाकर यांचे शेत जंगलालगत आहे. ते रोजच्या प्रमाणे आज सकाळी आपले शेत पाहण्याकरिता शेतात गेले असता त्यांचावर रानडूकरांनी त्याच्यावर हल्ला केले. सुधाकर कसा बसा स्वताला वाचवला. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली असून, हि माहिती गावात कळताच गावकर्यांनी सुधाकरला सरकारी दवाखाना गोंडपिपरी येथे भरती केले आहे. जंगलालगत असणारी शेती कशी करावी असा प्रश्न जंगलालगत शेतकर्यांना पडला आहे.



