खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर
*खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण*
गडचिरोली दि 15 आगस्ट
*खासदार अशोक नेते यांचे जनसंपर्क कार्यलय समोर स्वातंत्र दिनानिमित्य आज सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भामरागड तालुक्यातील कोठी जंगल परिसरात पोलीस- नक्षल चकमकीत शहीद झालेल्या वीर पोलीस जवानांना दोन मिनिटे मौन ठेवून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. तदनंतर भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेसमोर पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले आहे.*
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री रविंद्र ओलालवार, डॉ भारत खटी, ज्येष्ठ नेते नगरसेवक रमेशजी भुरसे, ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रमोदजी पिपरे, भाजप जनजाती मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, डेडूजी राऊत, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकरराव यनगंधलवार, युवा मोर्चा चे संजय बारापात्रे, गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे , नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, नगरसेवक केशव निंबोड, नप सभापती वैष्णवी ताई नैताम, लताताई लाटकर, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल डीस्टसिंगचे पालन ठेऊन उपस्थित होते.*



