Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे प्रलंबित गृह कर्ज तात्काळ द्या..

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे प्रलंबित गृह कर्ज तात्काळ द्या..

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर:- महाराष्ट्रात एक ते दिड वर्षांपासून सुमारे ३००० च्या जवडपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे प्रलंबित असलेले गृह कर्ज तात्काळ देण्यात यावे.या मागणीचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशन शाखा – चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले. नवीन नियमावलीनुसार महाराष्ट्रातील सुमारे तीन हजाराच्या आसपास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे घर बांधणीसाठी मागील एक वर्षापासून गृह कर्ज संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून महासंचालक कडे अर्ज सादर केलेले आहे.तरी अद्यापही कोणालाही गृहकर्ज मिळाले नसून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत .
गृह कर्ज घेण्यासाठी खुला प्लॉट किंवा एखादे घर खरेदी केल्यामुळे या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड भरण्याची वेळ आली असल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थिक ताण येत आहे.आर्थिक धोरण अशा परिस्थितीत त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणांमध्ये ४९८ यादी पूर्ण झाली असून त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, या ४९८ जणांची यादी संबंधित विभागांकडे देऊन व प्रतीक्षेत असलेल्या उरलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अर्ज निकाली लावून त्यांना त्यांच्या हक्काचे डिजि लोन लवकरात लवकर मिळावे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे .
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या सूचनेनुसार यावेळी निवेदन देताना भुवनेश्वर निमगडे, विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गजुभाऊ चांचूवार , चंद्रपूर जिल्हा मार्गदर्शक , सद्दाम अन्साटी . चंद्रपूर जिल्हा संघटक संजय खोब्रागडे ,चंद्रपूर जिल्हा वैद्य ,चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष ,अनिल वैद्य ,चंद्रपूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख , ऍड.आशिष नगराळे ,चंद्रपूर जिल्हा विधी सल्लागार ,विवेक आत्राम ,चंद्रपूर शहर अध्यक्ष , देविदास बोबडे ,चंद्रपूर हर उपाध्यक्ष ,साहिल मढावी , चंद्रपूर शहर संघटक ,विक्की डोंगटे ,चंद्रपूट तालुका अध्यक्ष , मंथना ननावरे ,राकेश कोकोडे , इत्यादी सचिव, राहुल हजर होते .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!