Vidarbh24News

Latest Online Breaking News

मायावृक्ष प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृव स्पर्धेचा निकाल घोषित

मायावृक्ष प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृव स्पर्धेचा निकाल घोषित

कवठी प्रतिनिधी

विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून त्यांना हक्काचं व्यासपीठ तयार करून देण्यासाठी व अश्या अनेक उदेशांना समोर ठेऊन लॉककडाऊन काळात स्थापन झालेल्या मायावृक्ष प्रतिष्ठान ने 11जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून कु.संप्रदा चटप, चंद्रपुर हिने प्रथम क्रमांक  पटकविला आहे.तर  द्वितीय क्रमांकाचा मानकरी अक्षय इळके, कोल्हापूर  हा ठरला आहे व  तृतीय क्रमांक सौ.भक्ती विशे, ठाणे यांनी पटकाविला आहे.
सर्व विजेत्यांना अनुक्रमे प्रथम पुरस्कार  व सन्मानचिन्ह ऋषभ कामठे, सहसचिव मायावृक्ष प्रतिष्ठान यांचे कडून, द्वितीय पुरस्कार  व सन्मानचिन्ह स्मृतीशेष अनुसयाबाई चौधरी,लोक प्रतिष्ठान मोरवा यांचे कडून, व तृतीय पुरस्कार  व सन्मानचिन्ह, मंगलाताई कोहळे, सामजिक कार्यकर्त्या राजनगट्टा यांचे कडून प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण मा.प्रा.दिलीप चौधरी प्रिसिद्ध वक्ते महाराष्ट्र राज्य, व मा.विनय पाटील प्रसिद्ध वक्ते म.रा. यांनी केले.
स्पर्धेत सम्पूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यातून 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मायावृक्ष प्रतिष्ठान चे कार्यक्रम प्रमुख अनुप कोहळे यांनी मुख्य भूमिका बजावली सोबतच संस्थेचे इतर पदाधिकारी अध्यक्ष रोशन कापगते,सचिव रोशन गट्टीवार व इतर सदस्य सुदर्सन साळवे, भूषण ,ऋषभ, गजानन, प्रवीण, पवन, समीर,माधुरी,पायल,तीर्थेश्वरी यांनी देखील मोलाचे योगदान दिले.
यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने सर्व विजेत्यांचे व सहभागी सर्व स्पर्धकांचे  अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!