ई पास चे आदेश मागे घेण्याकरिता जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
आदेश रद्द नझाल्यास राज्यभर एस.टि. बस रस्ता रोको आंदोलन करणार..
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- कोवीड-19 या महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये मणुन महाराष्ट्र सरकारने प्रवासी वाहतुकीस संपूर्ण बंदी घातली होती. मागील पाच महिन्या पासुन आम्ही सर्व खाजगी वाहन चालक-मालक सरकारच्या आदेशाचे प्रवासी वाहतुकदार पालन केलेला आहे.
परंतु आपल्या आदेशाने एस. टि. बस महामंडळाला ई पासची सक्ती रद्द करुण नुकतीच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.
परंतु ईतर खाजगी व टैक्सी प्रवासी वाहनांना ई पासची सक्ती कायम ठेवलेली आहे.
करीता जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाच्या वतीने खाजगी प्रवासी वाहनाची ई पास चे आदेश मागे घेऊन आम्हास जिल्ह्या बाहेर तसेच संपूर्ण राज्यात प्रवासास मुभा देण्यात यावी.
कोरोना च्या काळात आम्हा खाजगी वाहन चालकावर उपासमारीची वेळ आली असून आमच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करुण ई पासचा आदेश मागे घेण्यात यावे जर ३१ऑगस्ट पर्यंत ई पास आदेश रद्द नझाल्यास ०१सप्टेंबर २०२० रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने बेमुदत राज्यभर एस. टि. बस रस्ता रोको आंदोलन केले जाईल आंदोलनाच्या वेळी जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जिम्मेदारी महाराष्ट्र सरकारची असेल करिता मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन देतांना
विदर्भ सचिव-रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष-असलम शेख, जिल्हा उपाध्यक्ष-दिनेश कोहचाळे, रति दरडे -शहर अध्यक्ष, संजय नेरकर-जिल्हा सल्लागार
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, गडचिरोली च्या मर्गदर्शनात सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



