राष्ट्रीय साक्षरता गणेश मंडळ कायर , तर्फे एक दिवसीय विसर्जन
वणी – वणी तालुक्यातील कायर येथे एक दिवसीय गणेश विसर्जन करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या नियमांचे मान राखत कायर येथील राष्ट्रीय साक्षरता गणेश मंडळ,कायर यांनी शासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करत प्रशासनाचे पोलिस विभागाचे विजय मोडक यांच्या देखरेखीखाली शांततापूर्वक एक दिवसीय सार्वजनिक गणेश विसर्जन कायर येथे करण्यात आले.

राष्ट्रीय साक्षरता गणेश मंडळ मागील काही वर्षापासून खूप चांगल्यारित्या आपले कर्तव्य पार पाडत आहे.ह्या मंडळाने एकात्मता ही भावना राखत ही परम्परा कायम ठेवली आहे.ह्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर लांडे , उपाध्यक्ष नरेश विठ्ठल शंकावार व सचिव राहुल लांडे यांनी या मंडळाला खूप मोठे स्वरूप देण्याचे कार्य केले आहे .म्हणून कायर येथील गावकरी व मित्रमंडळी या गणेश विसर्जनाला सोशल डिस्टनसिंग चे नियम पालन करत विसर्जन करण्यात आले .





