गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्का
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्का
आज दिनांक 22/08/2020 रोज शनिवार ला जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर यांच्या वतीने गणपूर रै. येथे 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाल व शिल्ड आणि स्पर्धा परीक्षाची पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
12 वी च्या शालांत परीक्षेत सुरज बंडू गद्ये 78.00 टक्के घेऊन गुण संपादन केले आहे. तसेच इयत्ता 10 वी च्या शालांत परीक्षेत लोकमान्य टिळक विद्यालय गणपूर येथून प्रफुल अशोक पिंपरवार 91.00 टक्के घेऊन प्रथम , तर सौरभ शामराव भंडारवार 76. 00 टक्के. घेऊन गुणवंत यादीत स्थान पटकावले आहे .
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करतांना राकेश भंडारवार लिपिक प्राथमिक आरोग्य केंद्र गठ्ठा , वैभव बुरनवार संस्थेचे अध्यक्ष, प्रशांत मेकलवार माजी ग्रा.प. सदस्य, विशाल भंडारवार, रवींद्र बंडावार उपस्थित होते.



