न्याय मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भारतीय बौद्ध महासभा शाखा देसाईगंज च्या वतीने एस.डी.ओ. यांच्या मार्फतिने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/
देसाईगंज:- अनुसुचित जाती-जमाती जनतेच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा देसाईगंज च्या वतीने एस.डी.ओ.विशालकुमार मेश्राम यांच्या मार्फतिने उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय संविधानाने देशाला न्याय,समता, स्वातंत्र्य,समानता व बंधुता प्रदान केले आहे. या मानवी मुल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारवर दिलेली आहे. मात्र त्याप्रमाणे सरकारी जबाबदारी पार पाडतांना दिसत नाही.
देशभर अनुसुचित जाती-जमाती व बौद्धावर अन्याय-अत्याचार वाढले आहेत.
संविधानाने दिलेल्या सेवा-सुविधा षडयंत्र करून शिस्तबद्ध पद्धतीने काढून घेण्याचे काम बहुमतांच्या जोरावर चालू असल्याचा दिसून येते.
त्यामुळे समाजात व देशात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
हे राज्य पुरोगामी राज्य म्हणून देशात ओळखले जाते.
आणि याच राज्यात अन्याय अत्याचार वाढले असून या अन्यायाला न्याय देण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली.
कोव्हीड -19 च्या टाळेबंद कालावधीत महाराष्ट्रातील नागपुर,पिंपरी-चिंचवड,बिड,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,अहमदनगर,व जळगाव जिल्ह्यात घडलेल्या 15 गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांवर योग्य कारवाई करावी, साकेत नगरी- अर्थात अयोध्या या ठिकाणी समतलीकरणात अनेक बौद्ध अवशेष सांपडले असल्याने येथे बुद्धाचा वास होता.
त्यामुळे येथे भव्य बौद्ध विहार बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी.
मुंबई स्थित राजगृहास सुरक्षा पुरावावी,मुंबई येथील चैत्यभुमीस लागून असणारे अनाधिकृत बांधकामे त्वरीत हटवावे, डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातजवाई असणारे डाँ.आनंद तेलतुंबडे यांची अटक ही बनावट असल्याने त्रीस्तरीय न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करावी व त्यांना जामीन द्यावा,पदोन्नतीतील आरक्षण पुर्ववत सुरू करावे.
खाजगीकरण व कंत्राटीकरण थांबवावे, इयत्ता दहावी सी.एस.ई. इतिहासाचा अभ्यासक्रम डाँ.बाबासाहेब आंबेडकर विरहित आहे.
त्यात त्यांचा समावेश करावा. नविन शैक्षणिक धोरणांत आरक्षणाच्या तरतुदी बाबतची माहिती स्पष्ट करावी. अश्या विविध मागण्या घेऊन एस.डी.ओ.मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातुन ह्या व इतर मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली.
सदर निवेदन भारतीय बौद्ध महासभेचे देसाईगंज शाखेचे अध्यक्ष अरविंद लांजेवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
दरम्यान सचिव हंसराज लांडगे,कोषाध्यक्ष नाना लांडगे, जिल्हासरचिटणिस डाकराम वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते संजय गणविर, डाँ.चंद्रशेखर बांबोळे,अरविंद घुटके,राजकुमार मेश्राम, प्रेम मेश्राम,विलास वासनिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या, जाहिरात, कविता, व लेख करिता संपर्क साधा-9422645343



