Vidarbh24News

Latest Online Breaking News

नारायणा विद्यालय चंद्रपूर मनमानी कारोबार  पालकांना वेठीस धरून . शाळा बंद असतानाही फी भरण्याची सक्ती – विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण केले बंद

नारायणा विद्यालय चंद्रपूर मनमानी कारोबार  पालकांना वेठीस धरून .
शाळा बंद असतानाही फी भरण्याची सक्ती – विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण केले बंद

चंद्रपूर-आज सकाळी चंद्रपूर येथिल प्रतिष्ठित नारायणा विद्यालयातील घृणास्पद प्रकार समोर आला असुन शाळेने मागील 4 महिन्यांची फी भरली नसल्याने शाळेने जवळपास 600 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून पालकांवर दबाव टाकणे सुरू केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देशभरात सुरू असलेल्या कोरोना संक्रमणामुळे मागील सत्रातील अनेक शाळांच्या परिक्षा पुर्ण होऊ शकल्या नव्हत्या. लॉक डाऊन आणि शासकीय नियमांमुळे अजुनही शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे खाजगी शाळांनी पालकांकडून पैसे उकळण्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या गोंडस नावाखाली ऑनलाईन शिक्षण सुरु केले असुन ह्यात इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा आघाडीवर आहेत.
ह्याच पद्धतीने शहरातील नारायणा विद्यालय ह्या शाळेने सुद्धा ऑनलाईन क्लासेस सुरू केले. त्यानंतर शासनाची परवानगी किंवा फी बाबत कुठलेही स्पष्ट निर्देश नसतानाही पालकांना फी भरण्याचे फर्मान काढले आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांची फी भरलेली नाही त्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन शिक्षणातून बाद ठरविले असुन त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे आता येत्या काही दिवसातच शाळा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेत असुन पालकांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू केला आहे हे अत्यंत निंदनीय असुन ह्या शाळेवर कारवाई व्हावी असे शहरातील अनेक लोकांचे म्हणणे आहे.
काही पालकांनी शाळेला फी बाबतीत निवेदने दिली आहेत परंतु 15 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटूनही शाळेने ह्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नसून थेट कारवाई सुरू केली आहे.
कित्येक वर्षापासुन त्याच शाळेचे विद्यार्थी असुन दरवर्षी नियमित फी भरल्या जात असुनही शाळेने असे पाऊल उचलावे हे आश्चर्यकारक आहे.
आज नारायणा विद्यालयाच्या प्रांगणात जवळपास 200 पालक जमा झाले होते आणि त्यांनी शाळा व्यवस्थापनाला ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची विनंती केली त्याचप्रमाणे अजुनही शाळा सुरू झालेल्या नाही आणि लॉक डाऊन मुळे सर्वच पालकांचे रोजगार बुडाले आहेत, कित्येकांना आर्थिक अडचणी असुन शाळेने ह्या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मागील 4 महिन्यांचे 50% शिक्षण शुल्क आकारावे अशी पालकांची मागणी आहे.
पालकांची गर्दी आणि त्यांच्यातील आक्रोश बघुन भेदरलेल्या शाळा प्रशासनाने पोलिसांना शाळेत पाचारण केले होते हे विशेष. सरतेशेवटी उद्या पालकांसोबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन देऊन नारायणा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने मान्य केल्याने पालकांनी आपले आंदोलन पुढे ढकलले असुन उद्या ह्या संदर्भात सकारात्मक तोडगा निघाला नाही तर पालक काय भुमिका घेतात ह्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!