मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलन
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलन
विदर्भ 24 न्युज
ठाणे:- राज्यातील वर्ग ३ व वर्ग ४ गटातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवरील स्थगिती उठवून ४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात याकरिता कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
२०१७ पासून शासनाने पदोन्नत्या स्थगित केल्या आहेत याविरोधात २०१८ साली कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही की पेशवाई हे राज्यव्यापी आंदोलन देखील करण्यात आले होते कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तरीही कर्नाटक व इतर राज्यांनी मागासवर्गीय आरक्षणानुसार पदोन्नत्या दिल्या आहेत मात्र तत्कालीन राज्य शासनाने पदोन्नतीला स्थगिती दिली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक २१ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण हा संविधानिक हक्क आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू प्रभावीरित्या मंडण्याकरिता सक्षम वकिलाची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोरोना महामारीच्या काळात जमावबंदी असल्याने जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण व मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात मृत झालेल्या २९ कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत व सरकारी नोकरी देणे या मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ .शिवाजी पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन यशस्वी करण्यात आले . यावेळी संघटनेचे कोकण अध्यक्ष संतोष गाढे ,विनायक भालेराव ,दिनेश शिंदे ,अशोक गायकवाड ,आनंद सोनकांबळे,प्रफुल्ल गडकरी,व्यंकटेश कांबळे ,अजय झाजरे ,मिलिंद सूर्यवंशी,सतीश भोसले। आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

बातम्या, जाहिरात व लेख या करिता संपर्क साधा..9422645343



