पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार*
भुपेश मेश्राम
विरूर स्टेशन (प्रतिनिधी)
पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार*
राजुरा तालुक्यातील नवेगाव (विरूर)शिवारात विरूर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कंपार्टमेंट क्र. १४५ मध्ये आज संध्याकाळच्या सुमारास जंगला लागलेल्या शेत शिवारात गेलेल्या शेतकर्यांच्या अंगावर अचानक वाघाने हल्ला करून जागीच ठार मारल्याची घटना पाच वाजताचा सुमारास घडली.
राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी वासुदेव कोंडेवार वय ५० वर्षे असे शेतकर्याचे नाव आहे. आज पोळा असल्याने शेतात बैलांना धुण्यासाठी व चढाईसाठी शेतात घेऊन गेला होता. शेता लगत जंगल असल्याने बैल चराई झाल्यानंतर परत आणण्यासाठी गेला असतानी दबा धरून बसलेल्या वाघाने वासुदेव कोंडेवार यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, विरुर वनपरिक्षेत्र अधिकारी व सहाय्यक पोलिस निरीक्षक वडतकर व सहकारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
पोळ्याच्या दिवशी सदर घटनेमुळे गावात व परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. सतत चालू असलेल्या वाघाच्या हल्लामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पहीले कवीटपेट, चिंचोली,सुब्बई,धानोरा या गावात वाघाने जनावरे व माणसांवर हमले केले आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता परिसरात जोर धरू लागली आहे.



