जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोपटाळा येथे स्वातंत्र्यदिन साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोपटाळा येथे स्वातंत्र्यदिन साजरा
वणी – वणी तालुक्यातील धोपटाळा या गावात शासनाच्या नियमावलीनुसार 74 वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला .महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाने शासनाचा नियमाच्या वतीने काही नियमावली तयार करण्यात आली.

त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोपटाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल जुमनाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता उपस्थित म्हणून जिल्हा परिषद, धोपटाळा शाळेचे मुख्याध्यापक हरडे सहाय्यक शिक्षक प्रकाश तालावार व गावातील मंडळी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला शोभनीय म्हणून प्रस्ताविक मार्गदर्शक हरड़े यांनी केले व सूत्रसंचालन त्याच शाळेतील शिक्षक प्रकाश तालावर यांनी केले.



