घुग्घुस येथे काँगेस कार्यालयात 15ऑगस्ट स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
घुग्घुस येथे काँगेस कार्यालयात 15ऑगस्ट स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
विदर्भ24न्यूज प्रतिनिधी
घुग्घुस : 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला इंग्रजांच्या राजवटीतुन पारतंत्र्यातुन तब्बल 150 वर्षानंतर अनेक क्रांतीवीरांच्या बलिदाना नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न केल्या जात आहे.
मात्र यावर्षी देशात कोरोनाचे सावट पसरलेले आहे.
महाराष्ट्र तसेच जिल्ह्यात ही कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत असल्यामुळे यावर्षी काळजीपूर्वक सावधगिरीने उत्साहात साजरा करण्यात आला.
घुग्घुस काँग्रेस कार्यालय येथे सकाळी 8 वाजता शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते धवजारोहन करण्यात आले. राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, अजय उपाध्ये, अनिरुद्ध आवळे, शहजाद शेख,विशाल मादर, सचिन कोंडावार,अंकुश सपाटे,रमेश रुद्रारप, रंजित राखूडे, संजय कोवे, देवानंद ठाकरे गणमान्य अतिथी व नागरिकगण उपस्थित होते.



