*मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना**
**मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना**
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना निर्गमित
प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि. १० ऑ.- राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतुद करण्यात आली आहे.* येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधीत गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे जिल्हा परिषदांना सुचीत करण्यात आले आहे



