क्रांतिदिनी मारेगाव येथे गो ग्रीन क्लब तर्फे वृक्षारोपण व ग्रंथायलाचे उद्घाटन
🔹श्री.संजय चचाने यांच्या कार्याला…….
मारेगाव: क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनी गो ग्रीन क्लब चे अध्यक्ष श्रीयुत चचाने यांच्या कर्तृत्वाने वृक्षारोपण व सुसज्ज स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचे उद्घाटन अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले.
*”आवड असली की सवड मिळतेच आणि इच्छा असली की मार्ग सापडतोच.”*
या सुभाषिताची प्रचिती आज दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी श्री.संजय चचाने यांच्या संकल्पनेतुन आकार घेतलेल्या गो ग्रीन क्लब या ग्रुप द्वारे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उद्घाटन सोहळा तथा कुरेशी ले आउट मारेगाव येथील देवस्थान परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
श्री.संजय चचाने यांचे राहते घरी ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून श्री.प्रकाश कोरान्ने, तर अध्यक्ष म्हणून श्री.श्रीधर भरणे लाभले. प्रमुख अतिथी म्हणून श्री.राजेंद्र साखरकर श्री.कुर्ले , श्री.पैकूजी अत्राम, सौ.ज्योती साखरकर,सौ.सुरेखा चचाणे, सौ.हर्षदाताई चोपने(कुरले), श्री.मत्ते हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आदरणीय श्री.संजय चचाने यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागते ही भावना सतत मनात ठेऊन नविन काहीतरी समाजोपयोगी कार्य करीत राहणं हा जणू त्यांचा एक छंदच झाला आहे. आज तर त्यांनी ग्रंथालयासाठी आपले अगदी नविन घर उपलब्ध करून दिले. त्याच प्रमाणे सौ. ज्योती साखरकर आणि श्री.राजेंद्र साखरकर यांनी पुस्तके तथा 5000 रुपयाचा चेक देऊन दातृत्व दाखविले.
या प्रसंगी हर्षदा चोपने, ज्योती साखरकर, उद्घाटक श्री. प्रकाश कोरान्ने ,अध्यक्ष श्री.श्रीधर भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे शॉर्ट बट स्वीट असे सुंदर संचालन श्री.गजानन तुरारे याांनी तर आभार श्री.महेश लिपटे यांनी मानले.



