अपघात टाळण्यासाठी अखेर युवकांनीच श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती.
आशिष यमनुरवार विदर्भ २४ न्युज राजुरा शहर/तालुका प्रतिनिधी८८५५९९४००१
अपघात टाळण्यासाठी अखेर युवकांनीच श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती.
मागीलमहिनाभराच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले परंतु शेताला जायच्या मुख्य पांदण रस्ता पूर्णतः उध्वस्त झाला. या रस्त्याने जाणारी बैलगाडी कधी उलटणार हे सांगता येत नव्हतं. नक्कीच नुकसान होणारी परिस्तिथी तयार झाली होती.तेव्हा कुणाचीही वाट न बघता युवा पिढी जागृत झाली आणि काय काही तासात वाट सुलभ बनली. होय हे एकीचे बळ होय, कुणाचाही हेवा न करता अगदी आपली जबाबदारी समजून युवकांनी परिश्रम केले आणि संकटावर मात केली. नक्कीच हे आदर्श उदाहरण आहे.या कामासाठी रामा धांडे, विजय धांडे, सचिन धांडे, प्रदीप दुबे, संजय उमरे, मिलिंद पाटील,बाबाराव उमरे,पंकज दुबे आणि स्वप्नील क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.



