राजुर फाटा येथील रस्त्यात जीवघेणे खड्डे ,अपघाताची होण्याची शक्यता
🔹 *राजुर कॉ येथील प्रशासन सुस्त अवस्थेत*
🔹 *रात्री रस्त्यात कामात लागणारे पथदिवे सुद्धा निकामी*
🔹 *प्रशासनाचे दुर्लक्ष*
🔹 *जिम्मेदार कोण …..??????*
🔹 *पाचही यूनियनचे अधिकारिवर्ग गेले कुठे??????*
वणी :- वणी तालुक्यातील राजुर गावातील राजुर फाटा पासून गावात जाणाऱ्या सर्व रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून त्या खड्ड्यात माती किंवा मुरून टाकण्यात आले नसल्याने मोठ्या मोठे पाण्याची डबके तयार झाले असून तसेच रात्रीचे पथदिवे सुद्धा बन्द अवस्थेत आहे ,म्हणून घातपात होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली दिसून येत आहे .नागरीकांना रहदारी साठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मात्र राजुर कॉ येथील प्रशासनाचा दुर्लक्षित पणामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मात्र आजतागायत ते मोठे खड्डे भुजवन्यात आले नाही.
रस्त्यावर खड्डेच पडले आहेत, आभाळ नाही कोसळले ते बुजविण्यासाठी माती नको, टिकावू साहित्य वापरावे नाही तर पुन्हा पुन्हा मोठं मोठे तळे निर्माण होतील की काय असे गावातील नागरिकांनमध्ये सद्या चर्चा जोरात सुरू आहे.
गावातील सर्व रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असले व रस्त्यात पथदिवे चालू अवस्थेत ह्याही तरी त्याला जबाबदार कोण ??? त्या मुख्य रस्त्याचा नेमका दाता कोण????? हे ठरविने आधी गरजेचे आहे. नियोजना अभावी नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राजुर ह्या गावची मिनी इंडिया म्हणून ओळख आहे, मात्र याच गावात येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहुन जबाबदार कोण ???? हा प्रश्न चिन्ह निर्माण होते. सद्या स्थितीत रहदारीत पाण्याचे डबके तयार झाले आहे. गावातील त्याच रस्त्यावरून भांडेवाड़ा माइन कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे. हे पाहुन प्रशासनाचे लक्ष नेमके कुठे आहे ? हे दिसून येते.
पावसामुळे असे असमाधानकारक चित्र गावात निर्माण झाले असले, तरी याच पावसामुळे राजुर कॉ बहुतांश रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे रस्त्यांचा आणि यंत्रणेच्या कामांचा दर्जाही चव्हाट्यावर आला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांमधून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर डांबरी रस्त्यांवर अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडलेले असून, ते सहजासहजी निदर्शनास येत नसल्याने तेथे वाहने आदळत आहेत. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
गुळगुळीत रस्त्यांवरून चाललेली वाहने असे स्वप्न राजुरवासियांना रोजच पडत आहे. परंतु, तूर्तास तरी नागरिकांना पावसामुळे चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने दामटावी लागत असून, त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे अशी सध्या राजुर कॉ येथील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.या संबंधित अधिकाऱ्यांनी याची जबादारी घ्यावी. अन्यथा मोठी घटना घडेल की क़ाय येणारी वेळ सांगेल……म्हणजेच घटना होईपर्यन्त प्रशासन जागा होईल की क़ाय????????



