माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्त तालुक्यातील आशा वर्करचा करण्यात आला सन्मान
माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्त तालुक्यातील आशा वर्करचा करण्यात आला सन्मान
जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्याकडून प्रमाणपत्र, शिल्ड व अन्नधान्याच्या किटचे वितरण
सोमवार, दि. २७ जुलै.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी कोरोणा महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत असतांना योद्धे बनून राष्ट्रीय सेवा बजावणार्या आशा वर्कर्संचा सन्मान करत, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून सावली तालुक्यातील सेवा देत असणार्या आशा वर्कर यांना प्रमाणपत्र, शिल्ड व अन्नधान्याच्या कीटचे वितरण केले.
यावेळी मार्गदर्शनात्मक बोलतांना, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाधितांची नोंद होत आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारीच्या दृष्टीने रात्रंदिवस सेवा देऊन अपुऱ्या मानधनातही राष्ट्रीय सेवा देण्याचे काम तुम्ही आशा भगिनींनी केले आहे. याचे आम्हाला अभिमान आहे. असे प्रतिपादन माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत, जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जि. प. सदस्य संजय गजपुरे,बल्लारपूर नगराध्यक्ष हरिश शर्मा पं. स. उपसभापती, प्रा. गणवीर सर, रविन्द्र बोल्लीवार, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,तालुका महामंत्री सतिशभाऊ बोम्मावार,तालुका महामंत्री दिलीप ठिकरे, जि. प. सदस्या सौ. योगीताताई डबले, सौ. मनिषाताई चिमुरकर, पं. स. उपसभापती रविंद्र बोलीवार, देवराव मुद्दमवार, प्रकाश गड्डमवार, प्रकाश खजांची, गणपत कोठारे, युवा अध्यक्ष विनोद धोटे, तालुका शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, सौ. पुष्पाताई शेरकी, सौ. मानसी लाटेरवार, सौ. प्रतिभा बोबाटे, राकेश विरमलवार, राकेश कोंडबत्तूनवार, राहुल लोडेल्लीवार, मयूर गुरनुले, मयुर व्यास,आशिष संतोषवार, हरिष जक्कुलवार, आदर्श कुडकेलवार, आदित्य मुप्पावार, विशाल करंडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा राऊत यांनी केले..
यांसह आशा भगिनी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



