शहर पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
शहर पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
पोलिस विभागात खळबळ
चंद्रपूर-जिल्ह्यात कोरोना विरूध्द लढणाऱ्या यंत्रणामधील कोरोना योध्दांना कोरोना व्हायरसने आपल्या कवेत घेत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसाआधी चंद्रपूर महानगर पालिकेतील कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच आज दि. २७ जुलैला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबल देखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर शहरात सर्वसामान्यांना कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून कोरोनाशी दोन हात करीत आहेत. अश्यातच आता चंद्रपुरातील पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलीस दलही हादरले आहे. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जो पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटीव्ह आहे तो एक दिवसापूर्वी रजेवर गेला होता. त्यामुळे तो नेमका कुठे गेला होता, कुणाच्या संपर्कात आला याचा तपास आरोग्य यंत्रणा घेत आहे.



