भद्रावती पोलिसांनी पकडली १४ लाख 80 हजार रुपयांची अवैद्य दारू
भद्रावती पोलिसांनी पकडली १४ लाख ८0 हजार रुपयांची अवैद्य दारू
आरोपी गाडी सोडून फरार
*भद्रावती*- नागपूर वरून चंद्रपूरच्या दिशेने विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याचे माहिती वरून पोलिसांनी पहाटे ३ वाजता पेट्रोल पंप टप्पा येथे सापळा रचून १४ लाख ८० हजाराचा मालं हस्तगत केला असून आरोपी चालक गाडी सोडून पळून गेला आरोपी विरूद्ध भद्रावती पो स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की गुन्हे शोध पथक प्रमुख अमोल तुळजेवार यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की नागपूर वरून चॉकलेट कलर ची होंडा सिटी कार चा चालक हा विदेशी दारूची वाहतूक चंद्रपूर कडे करणार आहे या माहिती वरून पोलिसांनी पेट्रोल पंप टप्पा येथे ३ वाजता सापळा रचून त्या वाहनावर नजर ठेवली असता आरोपी हा नागपूर वरून होंडा सिटी कार क्र एम एच१५ डी सी ०५०४ ने येत असताना आरोपीला पेट्रोल पंप टप्पा येथे पोलीस असल्याचे दिसताच आरोपीने आपली गाडी अलीकडेच ठेवून गाडी सोडून पळून गेला पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता गाडीच्या आत मधल्या सिट वर ऑफिसर चॉइस विदेशी दारूच्या ३२०० निपा ३२ खर्ड्याचे बॉक्स मध्ये आढदून आल्या त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भद्रावती पो स्टेशन येथे दारूबंदी कलमान्वे गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेते आहे हि कारवाही ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात पो उपनिरीक्षक अमोल तुळजेवार पो शिपाई सचिन गुरूनुले हेमराज प्रधान केशव चिट गिरे निकेश ढेंगे यांनी केली.



