चामोर्शी येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी केला उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांचा जाहीर निषेध
• चामोर्शी : राज्यसभेमध्ये
शपथ घेताना शिवाजी महाराजांचा अपमान
केल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांचा चामोर्शी
येथील शिवसेना कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध
करण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपाल
सुलवावर यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत
शिवसेनेच्यावतीने चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट समोरील मुख्य रस्त्यावर
उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा जाहीर निषेध
करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी राज्यसभेत शपथ घेताना जो
प्रकार केला यामधून शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने त्यांचा जाहीर निषेध
केला असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावर यांनी व्यक्त
केला. यावेळी स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख सुलवायर, जिल्हा संघटक विलास
कोडाप, उप जिल्हा संघटक विलास डोंगरे, उपजिल्हा प्रमुख धर्मराज रॉय, शिवसेना
तालुका अध्यक्ष आसलवार, आदि उपस्थित होते. यावेळी सामाजिक अंतराचे
नियम पाळण्यात आले.



