कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थविक्री बंद चामोर्शी किराणा व्यापारी असोसिएशनचा निर्णय :
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थविक्री
बंद चामोर्शी किराणा व्यापारी असोसिएशनचा निर्णय :
दुकानातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचा
महत्वाचा निर्णय चामोर्शी किराणा व्यापारी
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहमतीने घेतला.
कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाथू सिगारेट, बिडी
यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली
आहे. ही बंदी यशस्वी करणे आपली नैतिक जबाबदारी असल्याचे लक्षात घेत
चामोर्शी किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची दिनांक २० जुलै
२०२० रोजी बैठक वसंत येनगन्देल्वार अध्यक्ष, गजानन भांडेकर कार्याध्यक्ष,
जैमिन पटेल सचिव व इतर सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला
शहरातील किराणा व्यापारी उपस्थित होते. मुक्तिपथच्या वतीने डॉ. आनंद बंग,
मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक आनंद इंगळे, विनायक
कुनघाडकर हे उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा धोका तालुक्यात व जिल्ह्यात पसरू नये यासाठी प्रशासनाच्या
आवश्यक त्या सूचनांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा
प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नैतिक
जबाबदारी लक्षात घेत शहरातील दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकणार
नसल्याचा निर्णय असोसिएशने यावेळी जाहीर केला. एखाद्या दुकानदाराने या
र्णयाचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केल्यास असोसिएशन त्याला
कुठलीही मदत करणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले.
डॉ. मयूर गुप्ता म्हणाले, कोरोनाचे संकट जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. अशा वेळी
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी
असोसिएशनने घेतलेला हा निर्णय कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी तसेच लोकांचे
आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. जास्तीत जास्त दुकानांना यात
सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी असोसिएशन ला केले आहे .



