वारंवार बलात्काराच्या घटना घडत असल्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण
वारंवार बलात्काराच्या घटना घडत असल्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण
सावली तालुक्यातील दुसरी घटना
सावली(प्रतिनिधी)
दिनांक १७ जूनला सावली तालुक्यातील पाथरी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार घडल्याची घटना ताजी असतांना पुन्हा आज सावली तालुक्यातीलच दुसऱ्या मुलीवर बलात्कार झाल्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावली तालुक्यातील सोनापूर येथिल एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी ला अटक करण्यात आल्याची घटना सावली पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. तू मला आवडतेस,तू का पाहत नाही? म्हणून आरोपीने त्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अत्याचार केल्याची तक्रार सावली पोलीस स्टेशन ला प्राप्त झाली त्यावरून सावली पोलीस स्टेशननी पोस्को टीम ला पाचारण करून तपास करीत या प्रकरणी आरोपी शुभम रोहिदास बांबोडे वय 23 वर्ष रा.सोनापूर याला अटक केली आहे. त्याचावर अपराध क्रमांक 144/2020 कलम 354,354(अ)451 भांदवी.सह कलम 8 बाल लेंगिक अत्याचार सं.आणि 2012 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास सुरू आहे.



