Vidarbh24News

Latest Online Breaking News

चिमुकल्या मुलीवर अत्याचार प्रकरणी मादगी समाज संघटना तालुका सावली तर्फे आरोपीला फाशी देण्याची मागणी 

चिमुकल्या मुलीवर अत्याचार प्रकरणी मादगी समाज संघटना तालुका सावली तर्फे आरोपीला फाशी देण्याची मागणी 

सावली तालुक्यातील पाथरी येथे एका दलित समाजात असलेल्या कुटुंबातील अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना (दि. 17) रोजी घडली असून आजच्या सुसंस्कृत समाजातील महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे . या घटनेतील सदर आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम (वय 45 वर्ष) याला अटक करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध दर्शवत पाथरी येथील मादगी समाज संघटनेने व्यापारी वर्गाला एकमताने निर्णय घेत संपूर्ण मार्केट कडकडीत बंद ठेवले आहे. त्यामुळे आज दिनांक 21 रोजी पाथरी कडकडीत बंद ठेवण्यात आले .या संदर्भात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन मादगी समाज संघटना यांनी जलदगती न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी व आरोपीला कठोरात कठोर व्हावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले

पुन्हा अशाप्रकारची घटना  घडू नये व कोणत्याच माता-भगिनीवर अत्याचार होऊ नये  म्हणून मादगी समाज संघटना तर्फे निषेध सभा घेण्यात आली. जलदगती न्यायालय स्थापन करून आरोपीला फाशीची शिक्षा दया अशी मागणी करण्यात आली असून यामध्ये मादगी समाज संघटना संघटक  रुपचंद लाटेलवार, भारत आलेवार,  रमेश लाटेलवार, नितीन गोरडवार,गंगाधर कोरेवार, अविनाश पेंडलवार, मानसी लाटेलवार, सुनिता आलेवार, पाथरीचे सरपंच राजेश सिद्धम, प्रहार सेवक प्रफुल तुम्मे, प्रहार सेवक उमाजी भैसारे, कमलेश वानखेडे, अनिल मडावी, आकाश आलेवार, कालीदास लाटेेलवार, अनिल देवताळे ,आदी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!