Vidarbh24News

Latest Online Breaking News

103 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही आसोला मेंढा तलाव पर्यटन स्थळाच्या प्रतीक्षेत ………..

103 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही आसोला मेंढा तलाव पर्यटन स्थळाच्या प्रतीक्षेत ………..
*नैसर्गिकदृष्ट्यारमणीय ठिकान *
*पर्यटकांना आकर्षित करनारे वातावरण *
सावली ( लोकमत दुधे )
सिंचनाच्या दृष्टीने शेतकर्यांच्या हितासाठी निर्माण केलेल्या आसोला मेंढा तलावाला आज 103 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2017 साली या तलावाने 100 वर्ष पूर्ण केले असून या तलावाचा शतक पूर्ती महोत्सव साजरा होईल अशी आशा असताना ती फोल ठरलेली आहे. या तलावाकडे शासनाचे लक्ष नसताना सुद्धा हा तलाव निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. ब्रिटिशांनी हा तलाव जरी सिंचनाच्या सोयीसाठी निर्माण केला असला तरी या तलावाने स्वतःच्या सौंदर्याने पर्यटकाचे मने जिंकली आहेत. कोणत्याही प्रकारची सौंदर्यासाठी शासकीय निधी नसताना सुद्धा हा तलाव पर्यटकांची मांदियाळीच ठरला आहे. गडबडीच्या व्यस्त जीवनात, धक्काबुकीच्या जीवनात कुठेतरी निसर्ग रम्य वातावरणात थोड वेळ काढून मनःशांती लाभावी असं प्रत्येकाला वाटत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरेच पर्यटन स्थळ आहेत जसे जागतिक दर्जाचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, घोडाझरी तलाव आणि अनेक पर्यटन स्थळे असताना सुद्धा जिल्ह्यातील जनता एक दिवसासाठी का होईना निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आसोला मेंढा तलावाला भेट देऊन समाधानी होतात. परंतु या तलावाला पर्यटन स्थळ घोषित करा ही मागणी शासन दरबारी कायम उपेक्षाच राहिली आहे. तलाव तुडुंब भरल्यानंतर वाहणारा धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. सांडव्यावरून वाहणारे खळबळ पाण्याचे दृश्य पर्यटकांचे मन हेलावून टाकणारे आहे. या तलावाला जर पर्यटन स्थळाचा दर्जा दिला तर हे विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून जनतेची पसंती होणार आहे. परंतु या आसोला मेंढा तलावाला 103 वर्ष पूर्ण होऊनही कुठल्याही राजकीय नेत्याने या कडे लक्ष दिले नाही हे या जिल्ह्यातील मोठे जलाशय असलेले आणि सावली, मूल,व पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले ब्रिटिश कालीन तलावाचे दुर्दैव आहे. मागील वर्षी आत्ताचे विद्यमान पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री नामदार श्री विजय भाऊ वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते असताना या तलावाला भेट दिली आणि या तलावाच्या सौंदर्यीकरणाला आपण दहा कोटीची मागणी करणार असून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आसोला मेंढा तलावाला पर्यटनाचा दर्जा देऊन पर्यटन स्थळ घोषित करू असे आश्वस्त केले. परंतु आज एक वर्ष जास्त लोटून गेले असताना सुद्धा आसोला मेंढा तलाव पर्यटन स्थळ घोषित होण्याची वाटच बघत आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव तुडुंब भरलेला आहे. आणि दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी हा तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. सध्या या क्षेत्राचे आमदार मा. नामदार विजय भाऊ वडेट्टीवार हे जिल्हाचे पालकमंत्री असून महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत. मंत्रिमंडळात त्यांची एक वेगळी छाप आहे. आसोला मेंढा तलावाला पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असता यावेळी ते पूर्ण होईल का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे ……..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!