सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 72 लक्ष रुपये मंजूर ……
सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 72 लक्ष रुपये मंजूर ……
* बेवारस पडलेले सभागृह होणार सुशोभित *
* पालक मंत्र्याचा प्रयत्न *
* गेली अनेक वर्षापासून दुर्गंधीने व्याप्त होते सभागृह *
सावली ( लोकमत दुधे )
नऊ ते दाहा हजार लोकसंख्या असलेल्या सावली मुख्यालयात एखादे सांस्कृतिक सभागृह असावे जेणेकरून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मदत होईल या उदात्त हेतूने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका निर्मितीच्या पूर्वीच खासदार फंडातून अंदाजे दहा लक्ष रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्गालगत शेतकरी राईस मिल च्या समोर सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती करण्यात आलेली या घडीला पंधरा ते वीस वर्षाचा कालखंड लुटून गेला सभागृहाची इमारत तयार झाली परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सभागृहाच्या देखभाल आणि दुरुस्ती दुर्लक्ष असल्याने अल्पावधीतच लक्ष रुपये खर्च करुन बांधलेले सभागृह दुर्गंधीचे साधन बनले चोरट्यांनी सभागृहातील दरवाजे पंखे विद्युत एसेसारीची चोरी करून संपूर्ण सभागृहची वाट लावली राष्ट्रीय महामार्गालगत अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून गजबजलेले हे सांस्कृतिक सभागृह अल्पावधीतच दुर्गंधीचे साधन बनले परिसरातील नागरिकांनी सभागृहाचा उपयोग शौचासाठी जुगार खेळण्यासाठी करण्याचा सपाटा सुरू केला सभागृह सभोवती कचऱ्याचे साम्राज्य इमारत भिंतीवरती काईचा लेप आदी कारणास्तव संपूर्ण इमारतीची वाट लागली दरम्यानच्या काळात काही संघटनांनी सदरची इमारत देखभालीच्या दृष्टीने हस्तांतरित केली परंतु त्यांना सुद्धा ते जमलं नाही त्यानंतर महसूल विभागाने स्वतःकडे हस्तांतर करून घेतले परंतु सांस्कृतिक सभागृहाच्या देखभाल आणि दुरुस्ती कडे सदरच्या विभागाचे ही दुर्लक्ष होत गेले परिणाम सभागृह बेवारस पडल्याने याची गंभीर दखल घेत विद्यमान नगरपंचायत प्रशासनाने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार ज्यांच्याकडे पाठपुरावा करून सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 72 लक्ष रुपये मंजूर करून घेतले 14 वित्त आयोग अंतर्गत माननीय मंत्री महोदयांच्या प्रयत्नाने सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 72 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून सांस्कृतिक सभागृहाचे काम सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे तत्कालीन प्रशासनाच्या दुर्लक्ष ते मुळे दुर्गंधीने बेवारस पडलेले हे सांस्कृतिक सभागृह सर्व सुविधा नी पुन्हा एकदा सुशोभित दिसणार आहे मुख्यालयातील नागरिकांच्या विविध कार्यक्रमाशाठी उपयोगी पडणार आहे सोबतच मुख्यालयातील बस स्टॉप ते व्यंकटेश मंदिर ; अतुल शेंडे ते बाजार चोक ; व्यंकटेश मंदिर ते ज्योतिबा फुले चौक ; आदी मार्गाचे सिमेंट काँक्रेट वेअरिंग कोट या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून सावली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत प्रशासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून सावली नगराच्या विकासासाठी न प प्रशासनाने मंत्री महोदया कळे नेहमीच पाठपुरावा केल्याचे दिसून येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री ना विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातूनच नगराच्या विकास कामाला गती निर्माण होत आहे त्यामुळे भविष्य नगराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र विशेष ….



