वणी शहरात लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचा स्मृति दिनानिमित्त तरुणातर्फे अभिवादन
*वणी शहरात लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचा स्मृति दिनानिमित्त तरुणातर्फे अभिवादन*
कोरोनाचा प्रादुभावात नियमाची पालन करत आज वणी शहरात लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचा महान प्रतिमेला तरुणपीढ़ी तर्फे हार अर्पण करण्यात आले .लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांनी 35 कादम्बरी,15 लघुकथा ,12 पटकथा ,10 पोवाडा शैलीतून गाणी लिहून सातासमुद्रपार पाठविले त्यांचा तरुण वर्गानी अभ्यास करावा असे आव्हान वणी येथील जेष्ट व्यक्ति महादेव जाधव यानी केले.वणी शहरात असलेले लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचा प्रतिमेला वणी येथील जेष्ठ व्यक्ति महादेव जाधव तसेच शैलेश खडसे यांचा हस्ते हार अर्पण करण्यात आले. त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व तसेच मातंग सामाजाचे तरुण व वयोवृद्ध लोक सुद्धा उपस्थित जमले होते.ह्या कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन वणी शहरातील मातंग समाजाचा कर्तव्यदक्ष तरुण अमोल बावने यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला उपस्थित म्हणुन लाभलेले राजू खडसे ,नरेश ससाने,सचिन शेंडे,सोनू पेंदोर ,ललित बावने,अशोक घनकसार,कैलास गेडाम हे सर्व उपस्थित होते.



