मूल येथील संस्थात्मक विलीगीकरण गृहात असलेले एकुण बारा जण कोरोना संसर्गीत रूग्ण
*मूल येथील संस्थात्मक विलीगीकरण गृहात असलेले एकुण बारा जण कोरोना संसर्गीत रूग्ण आसल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपुर्वी बिहार राज्यातुन ६५ जण रोजगारा करीता मूल येथे आले होते. तेव्हापासुन हे सर्व जण शासनाच्या संस्थात्मक विलीगीकरण गृहात होते. सर्वांचे स्वँब तपासणी केली असता ६५ पैकी ११ जण पाँझीटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे, इतर एक मध्ये दाबगांव येथील एक व्यक्ती तो ही संस्था विलीगीकरण गृहात असलेला कोरोना पाँझीटिव्ह असल्याचे तपासा अंती लक्षात आले आहे. कोरोनाग्रस्त म्हणुन आढळलेली सर्व मंडळी संस्थात्मक विलीगीकरण गृहातील असल्याने सध्यातरी फारशी भिती बाळगण्याचे कारण नाही तरीसुध्दा शासनाच्या निर्देशाचे पालन व्हावे. तुर्त एवढचं खर आहे.*



