विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयाचे तालुक्यातून घवघवीत यश संपादन
विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयाचे तालुक्यातून घवघवीत यश संपादन
भारत शिक्षण प्रसारक मंडळ ,सावली अंतर्गत विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची क्रमवारी संपादित केलेली आहे. शाळे अंतर्गत नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना तालुक्यातून येण्याचा बहुमान मिळाला आहे.
कला विभागाचा निकाल 90. 24 % लागला असून कला विभागातून सावली तालुका प्रथम कुमारी तृप्ती ज्ञानेश्वर मुसद्दीवार या विद्यार्थिनीला86.30%गुण मिळाले आहे. तर कु.यशोधरा प्रकाश घोटेकार 84.30% गुण मिळवून सावली तालुक्यातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहेत. कला विभागातून तृतीय क्रमांक आशाली मोरेश्वर मोहुर्ले 79.84%मिळाले आहे.
विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली मधील विज्ञान विभागाचा निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक संचित संकेत संतोष संचेती गुण 78.77% मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक कु.प्रांजली प्रशांत दंडावर या विद्यार्थिनीला77.38% गुण मिळाले आहे तर तृतीय क्रमांकाची मानकरी कु. निशू जीवनदास लेनगुरे ही विद्यार्थिनी ठरली आहेत
प्रथमतच चालू केलेल्या वाणिज्य विभागातून रोहित सुधाकर चौधरी हा विद्यार्थी प्रथम आला असून या विद्यार्थ्याला 77. 30 % गुण मिळाले आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे गुण कुमारी लक्ष्मीकेशव चौधरी 76 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहेत तृतीय क्रमांक कुमारी इशिका किशोर वडेट्टीवार 74.15 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहेत
एच एच सी व्ही सी विभागातून प्रथम येण्याचा मान अंकुश दिवाकर गेडाम,पिकशास्त्र तर द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे कुमारी प्रतीक्षा आरुषी भोयर, उद्यानशास्त्र तृतीय क्रमांक सुधीर प्रभाकर गेडाम 63 69% विद्युतशास्त्र विभागातून मिळविला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ गड्डमवार ,उपाध्यक्ष सौ नंदाताई अल्लुरवार, सचिव माननीय राजाबाळ पाटील संगीडवार ,शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. मधुकरराव कोतपल्लीवार आणि मुख्याध्यापक श्री. एम. एल. बुर्रीवार सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.



