वणीतील आणखी एक महिला निघाली पॉझिटीव्ह ,एकूण 14 रुग्ण
आता रुग्ण संख्या झाली 14
वणी शहरात एकापोठोपाठ एक कोरोना पाँझिटिव्ह रुगण आढळत असल्यामुळे वणीकरांची चिंता वाढली आहे.
शहरातील तेली फैलात राहणारी 65 वर्षीय महिला 8 जुलैला सेवाग्राम येथिल मेडिकल कॉलेज मध्ये उपचारासाठी गेली होती. या महिलेत कोरोनाचे लक्षण दिसुन आल्यामुळे तिचा स्वॅब तपासणी करिता पाठविण्यात आला होता. शुक्रवार दि.10 जुलैला रात्री उशिरा तिचा रिपोर्ट पॉजिटिव आला. या महिलेवर सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथे डेडीकेटेड हाँस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. तर तिच्या संपर्कातील व्यक्तींना प्रशासनाने क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. हि महिला दुसर्या साखळितील असुन तिचा मुलगा त्या व्यावसायीकाच्या प्रतिष्ठाणावर काम करणारा आहे. अशी माहिती हाती आली आहे.



