लॉकडाऊन कालावधिचे विज बिल वापसी घेण्यासाठी थेट विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ऊर्जामंत्र्यांना साकडे*
*लॉकडाऊन कालावधिचे विज बिल वापसी घेण्यासाठी थेट विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ऊर्जामंत्र्यांना साकडे*
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक 10 जुलै ला संपूर्ण विदर्भात 11 ही जिल्ह्यात व 120 तालुक्यात वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून वणी मध्ये सुद्धा करण्यात आले ज्यामध्ये वीज महावितरण उपअभियंता वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. लॉकडॉऊनमुळे 24 मार्च 2020 पासून सर्व व्यवसाय बंद आहे जनतेजवळ खायला पैसा नाही तर वीज बिल भरणार कुठुन हा प्रश्न असल्यामुळे सर्व वीज बिल माफ करण्यात यावे.आणि पुढे 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी,विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये असताना घरगुती वापराकरीता सरासरी साडे सात रुपये बिलाची आकारणी केली जाते आणि औद्योगिक वापराकरिता 11.50 रुपये दर आकारले जाते हे दोनही दर निम्मे करण्यात यावे,गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ असल्यामुळे शेती पपंचे सर्व थकीत वीज बिल माफ करण्यात यावे शेतीला पूर्ण वेळ पूर्ण विद्यूत दाबाची वीज पुरवण्यात यावी, मागेल त्याला तत्काळ वीज पुरवठा करण्यात यावा,आणि विदर्भात लोडशेडिंग संपविण्यात यावे या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख प्रा पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब राजूरकर युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,विदर्भवादी राजू पिंपळकर यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते.



