बेरोजगारांसाठी लघुउद्योगाचे मार्गदर्शन केंद्र सुरू करा नानाभाऊ ठाकरे यांची मागणी
बेरोजगारांसाठी लघुउद्योगाचे मार्गदर्शन केंद्र सुरू करा
नानाभाऊ ठाकरे यांची मागणी
कोरोना व्हायरस च्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात अनेक समस्या ना तोंड द्यावे लागत आहे. हल्लीच्या काळात तरुणांच्या हाताला काम नाही, व्यवसाय करायला पैसा नाही, डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे. अनेकांना उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले असून उपासमारीची वेळ आली आहे, काही तरुण मायदेशी परतले असून त्यांना शेतीचे कामे करायला अवघड जाते , अशा परिस्थितीत शासनाने प्रत्येक तालुका स्तरावर बेरोजगार तरुणांची यादी तयार करून प्रशिक्षण केंद्र सुरू करावे आणि लघुउद्योगासाठी कसली ही अट न ठेवता तात्काळ कर्ज देण्यात यावी. जेणेकरून कोणीही बेरोजगार राहता कामा नये. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मौदा तालुका प्रमुख नानाभाऊ ठाकरे यांनी केली.
केंद्र सरकारच्या व राज्यशासनाच्या कोणत्याही योजनेची घोषणा गावपातळीवर दवंडी स्वरुपात देण्यात यावी असे ही मत नानाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले.



