राजगृहा वरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मुलच्या वतिने तहसीलदार यांना निवेदन..
राजगृहा वरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मुलच्या वतिने तहसीलदार यांना निवेदन..
विदर्भ 24 न्यूज़ जिल्हा प्रतिनिधी/मूल:-मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. यात राजगृहाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेत असंतोषाची लाट पसरलेली असून राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी करिता वंचित बहुजन आघाडी मुल द्वारा माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह आहे. हे राजगृह या देशातील तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. राजगृहे या देशाचा ऐतिहासिक वारसा असून या ऐतिहासिक वारसाला काही जातीयवादी व समाजकंटकांनी द्वेष भावनेतून राजगृहाची तोडफोड केली. पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना न शोभणारी असून यामुळे देशातील तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावलेल्या असून संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने सदर घटनेचा निषेध केल्या जात आहे. वंचित बहुजन आघाडी मुल च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा जाहीर निषेध करून भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना पकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी करिता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे देवी खोब्रागडे, मधुकर कुराडे, छगन रामटेके,संजय गेडाम,सारीपुत्र कुंभारे, मुन्ना राव, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संपर्क:-9422645343



