मुलाचा प्रथम वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करुण वृद्धांना अन्नधान्य केले वाटप,
मुलाचा प्रथम वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करुण वृद्धांना अन्नधान्य केले वाटप,
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली:- दिनांक ७ जुलै रोजी मा.राजकुमार खोब्रागडे व सौ. अश्विनी खोब्रागडे हे दोघे ही पोलिस वीभागात नौकरी ला असुन मूरूमगाव पोलिस स्टेशन ला नियुक्त असुन त्यांच्या मुलगा अरन्स याच्या प्रथम जन्मदिवस वृद्धाश्रमात साजरा करुण वृद्धाश्रमात असलेल्या वृद्ध महिला व महिलांना २५ किलो तांदूळ,२० किलोआटा, ५तेल पॉकेट, दाळ , मीठ पुडा , बेसन इत्यादीचा समावेश असलेली अन्नधान्याची किट्स वितरित करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी स्वीकारून वृद्धाना अन्नधान्य विविध साहित्य वाटप करण्यात आले.मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथील वृद्ध महिला व पुरुषांना फळांचे वाटप करुण उपक्रम अशाप्रकारे भविष्यात सुद्धा करत राहु असे सांगुन एक प्रकारची माणूसकीचा परिचय दिला असुन विविध स्थरावरून खोब्रागडे परीवाराचे अभिनंदन केले जात आहे.




