अंगणवाडी सेविका, मदतनीस,स्वयंपाकी महिलांना मानधनात वाढ द्या. नानाभाऊ ठाकरे
अंगणवाडी सेविका, मदतनीस,स्वयंपाकी महिलांना मानधनात वाढ द्या. नानाभाऊ ठाकर
कोरोना व्हायरस च्या संक्रमणामुळे संपूर्ण देशाला चांगलाच फटका बसला आहे.
अशा परिस्थितीत आपल्या भारतात पोलिस कर्मचारी, डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून शासनाने फक्त आशा वर्कर,व गटप्रवतकाच्या मानधनात वाढ केली आहे. आज अंगणवाडीत गरोदर महिलांना ते सहा वर्षे पर्यंत बालकांचा शैक्षणिक लेखाजोखा, पोषण आहार,व आणणे घरपोच नेण्याचे काम मदतनीस करत असते.
संपूर्ण माहिती अंगणवाडीच्या माध्यमातून होत असते. आशा वर्करला सुध्दा अनेक कामाची मदत अंगणवाडी मधुन मिळत असते. लाँकडाऊनच्या काळात सुध्दा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गावात सर्वेत खूप मोलाची कामगिरी केली असून यांच्या सुध्दा मानधनात वाढ देण्यात यावी. असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे मौदा तालुका प्रमुख नानाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले.
अंगणवाडी सेविकाच्या मानधनाच्या ७५ टक्केवर मदतनीसचा मानधन लागु करण्यात यावा.
आणि जिल्हा परिषद च्या शाळेत स्वयंपाकी महिलांना फक्त १५०० ₹ मानधन मिळत आहे त्यांच्या पण मानधनात वाढ देण्यात यावी



