उपवीभागीय अधिकाऱ्याच्या वाहनचालकाची बंगल्यावरच गोळी झाडून आत्महत्या,
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही..
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- येथील पोलिस मुख्यालयातील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्यावर त्यांच्या वाहनचालकाने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मदन गौरकर ( ४८ ) असे मृत जवानाचे नाव आहे. मदन गौरकर हे उपविभागीय पोलिस अधिकारी ( अभियान ) भाऊसाहेब ढोले यांचे वाहनचालक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी कर्तव्यावर गेल्यानंतर त्यांनी बंगल्यावरच रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. लागलीच त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. १९९२ मध्ये गडचिरोली पोलिस दलात भरती झालेले श्री.गौरकर हे सेमाना – न्यायालय मार्गावरील आनंदनगर वसाहतीत आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्य करीत होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली,हे कळू शकले नाही . गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत .



